Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्य कोरोना रिपोर्ट आतापर्यंत ३३ हजार ६८१ रुग्णांना घरी सोडले

state corona report
, शुक्रवार, 5 जून 2020 (09:34 IST)
राज्यात गुरुवार १३५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३ हजार ६८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २९३३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४१ हजार ३९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
 
सध्या राज्यात ४६ शासकिय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख १० हजार १७६ नमुन्यांपैकी ७७ हजार ७९३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६० हजार ३०३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७३ हजार ०४९ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कर्नाटकात 4.0 तर आणि झारखंडमध्ये 4.7 तीव्रतेसह भूकंपाचे धक्के